‘देवयानी हजारे’ – एक मॉडेल, यशस्वी व्यावसायिका, गृहणी आणि समाजसेविका, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यापासून 440 किमी अंतरावर असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील देवयानी हजारे यांना मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस ऑफ महाराष्ट्र 2019 चा किताब मिळाला आहे. याशिवाय देवयानी यांनी मिसेस महाराष्ट्र ब्युटी विथ ए पर्पस हा किताबही जिंकला आहे. ही स्पर्धा 8 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील हयात हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

यात 50 फायनलिस्टचा समावेश होता. या स्पर्धेसाठी पूर्ण देशातून अनेकांनी ऑडिशन दिलं होतं. फायनलची निवड ही मॉडेलची शारीरिक रचना, व्यक्तित्व, आत्मविश्वास आणि प्रभाव या आधारावर करण्यात आली. खास बात अशी की देवयानी हजारे एक हाऊसवाईफ तर आहेतच याशिवाय त्या बिजनेसवुमनही आहेत. कुटुंब बिजनेस सांभाळताना त्यांनी आपलं स्वप्नही पूर्ण केलं ही खरंच सुत्य गोष्ट आहे.

हाऊसवाईफ सोबत एक यशस्वी बिजनेसवुमन आहे देवयानी हजारे

2005 साली लग्न केलेल्या देवयानी आपले पती आणि आपल्या 2 मुलांपर्यंतच सीमीत होत्या. परंतु गेल्या 5 वर्षात तीन कंपन्या सांभाळता सांभाळता त्या एक यशस्वी बिजनेसवुमन बनल्या. देवयानी वेग गंगा आरो वॉटर, ट्रेडिंग क्लॉथ सेंटर, हाय रेहा इलेव्हेटरची मालकीन आहे. यापैकी आरो वॉटर आणि ट्रेडिंग क्लॉथ कोल्हापूर जिल्ह्यातील गार्गोटीमध्ये आहे. हाय रेटा इलेव्हेटर ही कंपनी लिफ्ट आणि इलेव्हेटरच्या इन्स्टॉलेशन आणि मेंटेनंसचं काम करते. त्या 35 ते 40 लोकांना रोजगार देतात.

देवायनी याबाबत बोलताना म्हणाल्या, “ग्लॅमर आणि फॅशन इंडस्ट्रीकडे नेहमीच माझा कल राहिला आहे. जेव्हा मानुषी छिल्लरला मिस वर्ल्डचा किताब मिळाला तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली. यानंतर मी माझा प्रवास सुरू केला. माझ्या यशाचं श्रेय माझे पती श्रीराम आणि कुटुंबाला जातं. या पेजेंटमध्ये भाग घेण्यासाठी जेव्हा मी माझ्या पतीला सांगितलं तेव्हा त्यांनी मला स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली.”

‘अशी’ केली स्पर्धेची तयारी

स्पर्धेत जाण्याआधी त्यांनी घरीच काही गोष्टींना सुरुवात केली. एका स्पेशल कोर्स जॉईन केला. आपले स्किल्स त्यांनी आणखी अपडेट केले. त्यांनी व्हिडओज पाहिले, एक्सपर्टसोबत चर्चा केली. पुस्तकं वाचली. यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला सुरुवात केली. संतुलित आहार आणि नियमित एक्सरसाईज सुरू केली. त्यांनी पूर्ण समर्पण दिलं. त्यांनी 75 किलो वरून त्यांचं वजन 55 किलो केलं. यानंतर त्यांनी दिवा पेजेंटमध्ये भाग घेण्यासाठी नावाची नोंदणी केली.

इंटरनॅशनल पेजेंटमध्ये भाग घेऊ इच्छितात देवयानी

देवयानीला पुढे इंटरनॅशनल पेजेंटमध्येही भाग घ्यायचा आहे. सोबतच त्यांना मॉडेलिंग आणि फिल्म असायनमेंटही करायच्या आहेत. आधी त्या कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देणार आहेत. यानंतर वेळ मिळाला तर त्या इंटरनॅशनल पेजेंटमध्ये भाग घेणार आहेत. दृढ इच्छा, आत्मविश्वास, आणि समर्पण असेल तर तुम्ही काहीही करू शकता असं त्या सांगतात.

देवयानी एक समाजसेविकाही आहेत

सौंदर्यासोबतच एक संवेदनशील हृदय असणाऱ्या देवयानी हजारे वेगवेगळ्या डोनेशन कॅम्पमध्ये गरजूंना पुस्तकं आणि जेवण देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्याचं काम करतात. त्या नेत्रहीन लोकांसाठी चेतन सेवांकुर संस्थेलाही सपोर्ट करतात. प्रत्येक गुरुवारी त्या गरजूंना जेवण, पुस्तक, कपडे आणि अनेक गरजेच्या वस्तू देतात. दिवाळी असो वा गणपती प्रत्येक उत्सवात या मुलांपर्यंत आधी मिठाईचा बॉक्स पाठवायला त्या विसरत नाहीत.

देवयानी यांच्या खासगी आयुष्याबद्दल…

देवयानी कोल्हापूरला राहतात. त्यांनी एमएची डिग्री घेतली आहे. लाँग ड्राईव्ह सोबतच त्यांना नवीन ठिकाणी फिरायला खूप आवडतं. गरजू आणि गरिबांची सेवा करून त्यांना आत्मिक समाधान मिळतं. त्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे. देवयानी यांच्या पतीचं नाव श्रीराम अआहे. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा 12 वर्षांचा आहे तर एक 8 वर्षांचा आहे. त्यांची नावं चिन्मय आणि हर्षवर्धन आहे. देवयांनी यांच्या आईचं नाव सुनंदा आणि वडिलांचं नाव सुरेश घरपण्कर आहे.