मोठा दिलासा ! ‘कोरोना’चं औषध 30 पैशांत, भारताच्या जवळ आहे Dexamethasone चा ‘साठा’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूच्या उपचारासाठी सर्वात मोठी आशा म्हणून पुढे येत असलेल्या डेक्सॅमेथासोनचा औषधात भारतात प्रचंड साठा आहे. हे औषध भारतातून 107 देशांमध्ये निर्यात केले जाते. भारतात या औषधाचे 20 ब्रँड आहेत. देशात या औषधाच्या 10 गोळ्यांच्या स्ट्रिप्सची किंमत फक्त 3 रुपये आहे. कोरोना विषाणूसाठी रामबाण असल्याचे म्हंटले जाणारे हे औषध भारताने 107 देशांमध्ये निर्यात केले आहे. निर्यात केलेल्या औषधाची किंमत सुमारे 116.78 कोटी आहे. हे औषधाचा वापर संधिवात, त्वचा रोग, अ‍ॅलर्जी, दमा, क्रोनिक ऑब्सट्र्क्टिव लंग डिजीस, दात आणि डोळ्यांना सूज आल्यावर केला जातो. डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांना दिले जाणारे हे स्टेरॉइड आहे.

भारतात, जाईड्स कॅडिला, वॉकहॉर्ट, कॅडिला फार्मास्युटिकल्स, जीएलएस फार्मा आणि वीथ लिमिटेड नावाच्या औषध कंपन्या या औषधाचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या आहेत. महत्वाचे म्हणजे हे औषध खूप स्वस्त आहे. त्याच्या दहा गोळ्या फक्त 3 रुपयांमध्ये येतात. म्हणजेच 30 पैशांना एक टॅबलेट. दरम्यान, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी या औषधाची क्लिनिकल चाचणी ब्रिटनमधील 2104 कोरोना रूग्णांवर केली. जे निकाल आले ते आर्श्चयचकित करणारे होते. या औषधाच्या वापरामुळे व्हेंटिलेटरवरील रूग्णांचा मृत्यू एक तृतीयांश कमी झाला.

देशात डेक्सॅमेथासोनचे 20 ब्रँड आहेत. भारतात या औषधाची बाजारपेठ वर्षाला 100 कोटी रुपये आहे. औषध कंपन्या हे औषध तीन प्रकारात बनवतात. टॅब्लेट, इंजेक्शन आणि ओरल ड्रॉप. डेक्सामेथासोन 1957 मध्ये बनविले गेले. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला 1961 मध्ये मान्यता मिळाली. हे असे औषध आहे जे सूज, जळजळ, खाज सुटणे, अ‍ॅलर्जी, लाल स्पॉट्स इत्यादी संपवते.

भारतात बनवलेल्या डेक्सामेथासोनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. हे औषध जगातील 107 देशांमध्ये पुरविले जाते. अमेरिकेत, नायजेरिया, कॅनडा, रशिया, युगांडा हे भारतातील डेक्सामेथासोनचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. डेक्सामेथासोनच्या निर्यातीत हे पाच देश 64.54 टक्के आहेत. दरम्यान, तज्ञांच्या मते डेक्सामेथासोनच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करणे फार घाईचे असू शकते. परंतु चाचणीतून आलेले निकाल खूप सकारात्मक आहेत.