… म्हणून 1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) विमान प्रवासासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. १ एप्रिलपासून विमानचालन सुरक्षा शुल्कात वाढ करण्यात येणार असून, यामुळे विमान (हवाई) प्रवास महागणार आहेत. तर देशान्तर्गत प्रवास करण्यासाठी विमानचालन सुरक्षा शुल्कात ४० रुपये दरांनी वाढ करण्यात आली आहे.

विमानचालन सुरक्षा शुल्कामध्ये (Aviation Security Fee) वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे १ एप्रिलपासून विमान प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तर विमानचालन सुरक्षा शुल्काचा वापर विमानाच्या सुरक्षेसाठी केला जातो. आता विमानचालन सुरक्षा शुल्क म्हणून देशांतर्गत प्रवाशांना २०० रुपये द्यावे लागतील, पूर्वी यासाठी १६० रुपये द्यावे लागत होते.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी शुल्क ४.९५ डॉलरवरुन ५.२० डॉलर करण्यात आली होती, आता हे शुल्क, १२ डॉलर झाले आहे. यादरम्यान, विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हे शुल्क दयावे लागते. परंतु, दोन वर्षांपेक्षा अल्प वयाची मुले, ड्युटी एअरलाइनवर असणारे कर्मचारी किंवा एकाच तिकीटाद्वारे कनेक्टिंग फ्लाइट पकडणारे प्रवाशी अशा काहींना यात सूट मिळते. दर ६ महिन्यांनी विमानतळ सुरक्षा शुल्काचा आढावा घेतला जातो. २०२० च्या सप्टेंबर महिन्यात विमानचालन सुरक्षा शुल्क (Aviation Security Fee) १५० रुपये होती, त्यामध्ये, १० रुपयांची वाढ केली गेली. आणि शुल्क १६० रुपये झाली, आता हे शुल्क २०० रुपये झाले आहे.