विमान प्रवासात ‘ही’ चूक पडू शकते महागात, ताबडतोब फ्लाईटमधून उतरवले जाईल, जाणून घ्या नवे नियम

नवी दिल्ली : जर तुम्ही विमान प्रवास करणार असाल तर तुम्हाला काही नियमांचे सक्तीने पालन करावे लागेल, अन्यथा फ्लाईटमधून उतरवले सुद्धा जाऊ शकते. कोरोनाची वाढती प्रकरणे पहाता डीजीसीएने विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी काही दिवसांपूर्वी नवीन नियम जारी केले आहेत. आता एयर तिकिट बुक करण्यासोबतच एयरलाईन्सकडून प्रवाशांना कोविड प्रोटोकॉलची एक ई-कॉपी पाठवली जाईल. ज्याचे पालन करणे अतिशय आवश्यक असेल.

डीजीसीएची गाईडलाईन्स जारी
13 मार्चला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डीजीसीएने सर्व एयरलाईन्सला हा आदेश जारी केला होता. एयरलाईनकडून जो कोविड प्रोटोकॉल पाठवला जाईल त्याचे अरायव्हल, डिपार्चर आणि प्रवासादरम्यान पालन करावे लागेल. डीजीसीएचे म्हणणे आहे की, जर विमानाच्या आत मास्क घालण्यास निष्काळजीपणा केल्याचे किंवा मास्क योग्य प्रकारे न घातल्याचे आढळल्यास आणि कोरानाच्या दुसर्‍या गाईडलाईन्सचे पालन न केल्यास विमानातून उतरवले जाईल.

सतत मास्क घालणे आवश्यक
नव्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, एयरपोर्टमध्ये दाखल होण्यापासून प्रवासादरम्यान आणि एयरपोर्टच्या बाहेर पडण्यापर्यंत मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्कने नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलेले असावे. याच्या तपासणीसाठी सीआयएसएफ आणि दुसरे पोलीस कर्मचारी तैनात राहतील. जर एखादा प्रवाशी वारंवार इशारा देऊनही प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असेल तर प्रवाशाला ‘अनरुली पॅसेंजर’ मानले जाईल. प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाईल.

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका दुसर्‍या आदेशात डीजीसीएने म्हटले होते की, जो विमान प्रवासी उड्डाणादरम्यान फेस मास्क घालणार नाही त्यांना पुढील प्रवासासाठी ‘नो फ्लाय लिस्ट’ मध्ये टाकले जाईल. म्हणजे प्रवाशी विमानात प्रवास करू शकणार नाही. जर असे कुणी एका एयरलाईनने केले तर अन्य एयरलाईन्स सुद्धा त्या प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकतील.