केंद्राचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’ची लस इतक्यात नाहीच

पोलीसनामा ऑनलाइन –  भारतात कोरोना लस (corona vaccine in india) उत्पादक कंपन्यांनी आपल्या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना लशीला आपात्कालीन वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, या अर्जावर सध्या विचार केला जाणार नाही. दरम्यान, यूकेमध्ये कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (Emergency Use Authorization) मंजुरी मिळाली आहे.

भारतात सर्वात आधी Pfizer ने EUA साठी परवानगी मागितली होती. नंतर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने देखील आपल्या ‘कोविशिल्ड लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आणि त्यापाठोपाठ भारत बायोटेकने लशीकरण सुरू करण्यासाठी तातडीने परवानगी देण्यासंदर्भात अर्ज केला होता. दरम्यान, भारतात हैदराबादमधील भारत बायोटेकनं (Bharat Biotech) कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटने (Serum Institute of India) कोव्हिशिल्ड या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी यासाठी अर्ज केला होता. या संदर्भात भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे ही मागणी करण्यात आली होती. आपात्कालीन वापराबाबत डीजीसीआय अद्याप तरी विचार करणार नाही, अशी माहिती मिळते आहे. कारण, या लशींचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. लशीच्या सुरक्षिततेबाबत पुरेसा डाटा उपलब्ध नाही.