पोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक विचारात ठेवून कर्तव्य पार पाडावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

देशपातळीवरील पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेच्या समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी त्यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. देशांतर्गत सुरक्षा या विषयावर ही परिषद आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय या वेळी उपस्थित होते. पोलीसांचे कामाचे स्वरुप तसेच कामाच्या वेळा निश्चित नसतात.पोलिसांवर ताण वाढत आहे.

कामाचा ताण, नागरिकांशी होणारा संवाद या सर्व गोष्टी विचारात ठेवून पोलिसांनी आपण समाजासाठी तसेच तळागळातील नागरिकांसाठी काम करत आहोत, याची जाणीव ठेवावी, असे यावेळी मोदी यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील नवनवीन बदल स्विकारुन पोलीस दलाने देशातंर्गत घडामोडी तसेच गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मोदी यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून काम करावे…
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत बोलताना मोदी यांनी महिलांच्या बाबतीतील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे. महिलांच्या तक्रारी स्विकाराव्यात. त्यांच्या तक्रारींकडे काणाडोळा करता कामा नये.

Visit : Policenama.com