DGP Rajnish Seth | …तर राज ठाकरे यांच्यावर आजच कारवाई; DGP रजनीश सेठ ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मशिदीवरील भोंगे (Azaan On Loudspeakers) आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) यावरुन राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलीस तात्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डीजीपी रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) बोलत होते. दरम्यान, मनसेने सार्वजनिकपणे हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आजचा शेवटचा दिवस असल्याचे म्हणत मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज शिवतीर्थावर (Shivtirth) महत्वाची बैठक बोलावली. याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला असून गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) हे तातडीने मुख्यमंत्र्यांच्या (CM) भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी त्यांनी पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली.

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
त्यानंतर महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे.
त्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे डीजीपी रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) सभेबाबत बोलताना डीजीपी म्हणाले,
राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील भाषणाचा स्थानिक पोलीस आयुक्तांनी अभ्यास केला असून या प्रकरणात काही सापडल्यास आजच कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
औरंगाबादच्या भाषणात भडकाऊ वक्तव्य केल्याने कार्यकर्ते आणि अन्य नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादमधील मनसे नेत्यांच्या घरी पोलीस पोहचले आहेत.
राज ठाकरे यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title :-  DGP Rajnish Seth | dgp-rajnish-seth-gives-clear-instructions-to-maharashtra police mns chief raj thackeray aurangabad sabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

Daund MNS City President | मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने मनसेच्या दौंड शहराध्यक्षांचा राजीनामा

Maharashtra Police | ‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द’ – पोलीस महासंचालक रजनीश सेठ

Heart Attack First Aid | ‘हार्ट अटॅक’ आला तर तात्काळ करा ‘ही’ 5 कामे, वाचवू शकता रुग्णाचा जीव