DGP Rajnish Seth | ‘पोलीस पाटलांचा सारथी’ पुस्तकाचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – DGP Rajnish Seth | पोलीस पाटलांसाठी उपयुक्त असलेल्या ‘पोलीस पाटलांचा सारथी’ (Police Patil Sarthi) या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ (DGP Rajnish Seth) यांच्या हस्ते बुधवारी (दि.15) करण्यात आले. मुंबईत झालेल्या कार्यक्रामात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune City CP Retesh Kumaarr), पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Pimpri Chinchwad CP Vinay Kumar Choubey), अपर पोलीस महासंचालक, CID, प्रशांत बुरडे (Prashant Burde), अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta), अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद (Sunil Ramanand), विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (Sunil Phulari), सुधीर हिरेमठ (Sudhir Hiremath), संजय शिंदे (Sanjay Shinde), पंकज देशमुख (Pankaj Deshmukh), ज्योती क्षीरसागर (Jyoti Kshirsagar), वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

‘पोलीस पाटलांचा सारथी’ हे पुस्तक निवृत्त पोलीस उप अधीक्षक डॉ. राम पठारे (Retired DySP Dr. Ram Plateau) यांनी लिहीले आहे.
सदर पुस्तकाचे प्रकाशन, पोलीस संशोधन केंद्र (CPR) पुणे, या संस्थेने केले आहे.
पुस्तकाची प्रस्तावना अपर पोलीस महासंचालक (नि.) अशोक धिवरे (IPS Ashok Dhivare) यांनी लिहिली आहे.
पुस्तकास जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी पत्रद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

 

पोलीस पाटील हा गाव पातळीवरील शासनाचा शेवटचा व महत्वाचा घटक असून त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त होणार आहे.
पोलीस पाटलांचे कायदे विषयक ज्ञान वृध्दींगत व्हावे, या दृष्टीने या पुस्तकात 50 पेक्षा जास्त कायद्यांचा समावेश केलेला आहे.
हे पुस्तक सर्व सामान्य नागरीकांना तसेच नव प्रविष्ट पोलीसांना देखील उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस पाटील महासंघाचे बाळासाहेब शिंदे यांचे ‘पोलीस पाटलांचा सारथी’ यामध्ये महत्वाचे योगदान आहे.

 

Web Title :- DGP Rajnish Seth | DGP Rajnish Seth Publication of the book ‘Police Patalancha Sarathi’ by Director General of Police Rajnish Seth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचं टेन्शन वाढलं? ‘किंगमेकर’ ची प्रचारातून माघार

Pune Accident News | पुणे-नगर रोडवर डॉक्टर दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात, महिला डॉक्टरचा मृत्यू