DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी, काही एसीपींसह 25 पोलिस अधिकारी ‘गोत्यात’, निलंबनाच्या हालचालींना वेग; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) आणि इतर पोलिसांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांतील अधिकाऱ्यांचे निलंबन (Suspension) करण्याची परवानगी मागितली आहे. याबाबत प्रस्ताव राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी राज्य गृह विभागाला (State Home Department) दिला आहे. डीजीपी पांडे यांनी दिलेल्या प्रस्तावात परमबीर सिंगसह अन्य 4 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटीचा लेटरबाॅम्ब टाकणारे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह 4 डीसीपी दर्जाचे, तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकरणात आरोप असणा-या एसीपी दर्जाचे अधिकारी असे एकूण साधारण 25 पेक्षा जास्त पोलिस अधिका-यांची निलंबनाची मागणी केली गेली आहे.

दरम्यान याबातचा प्रस्ताव पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी राज्याच्या गृह विभागाला दिला आहे. दरम्यान या प्रकरणात आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, यासंदर्भात माहिती राज्यातील पोलिसांकडे मागवण्यात आली आहे. राज्याच्या DGP यांनी या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, परमबीर सिंगसह अन्य 16 पोलिस अधिकाऱ्या विरोधात अकोला येथे पहिला गुन्हा (FIR) दाखल होता.
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे (Police Inspector Bhimrao Ghadge) यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच, दुसरा गुन्हा मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात 23 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर कोपरी पोलिसांत गुन्हा (FIR) नोंद करण्यात आला. यावरुन पोलिस दलात मोठी खळबळ उडाली.

Web Titel :- DGP Sanjay Pandey | Former Mumbai Police Commissioner Parambir Singh, 4 DCPs, 25 police officers including some ACPs in Goa, speeding up suspension moves; Learn the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळू शकतात 4000 रुपये, तात्काळ जमा करा हे कागदपत्र, जाणून घ्या

Anti Corruption | 12 लाखाचं लाच प्रकरण ! 2 लाखाची लाच घेताना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमधील अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ

Pune News | महाराष्ट्राने नेहमीच राजकीय आणि सांस्कृतिक आदर्श प्रस्थापित केला – नितीन गडकरी