DGP Sanjay Pandey | पोलिसांच्या संयमाचा गैरफायदा घेतल्यास दांडुका उगारावा लागेल’ – पोलीस महासंचालक संजय पांडेय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोना नियम शिथिल केल्यानंतर लोणावळ्यासह पर्यटन स्थळांवर (tourist places including Lonavla) नागरिकांनी गर्दी केली. यासंदर्भात बोलताना संचारबंदी असतानाही लोणावळ्यात पर्यटकांकडून गर्दी होत आहे. पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. अन्यथा पोलिसांना दांडुका उगारावा लागेल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेय (DGP Sanjay Pandey) यांनी दिला आहे. डीजीपी संजय पांडेय (DGP Sanjay Pandey) आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर डीजीपी संजय पांडेय यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. संचारबंदी, जमावबंदी (Curfew) तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करुन काही पर्यटक गर्दी करत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पोलिसांनी संयम राखला आहे…
पोलिसांकडून कारवाई केली जात असताना काही जण वाद घालत आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करित आहेत. पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. अन्यथा पोलिसांना त्यांचे हत्यार बाहेर काढावे लागेल. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे, संजय पांडेय यांनी यावेळी सांगितले.

 

‘डीजी लोन’ बाबत लवकरच निर्णय

पोलिसांना घरासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. परंतु सध्या ही सुविधा बंद आहे. त्याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडेय म्हणाले, काही तांत्रिक अडचणींमुळे डीजी लोनमध्ये अडथळे येत आहेत. मात्र, शासन स्तरावर याबाबत चर्चा झाली आहे. कार्यवाही सुरु झाली आहे. त्यामुळे काही महिन्यातच ही समस्या सुटेल आणि पोलिसांनी डिजी लोन मिळेल.

तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे.
आपल्याकडे देखील तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
देश पातळीवर टास्क फोर्सचे मेंबर व तज्ज्ञ आणि संबंधित संस्थांनी जाहीर केले आहे.
त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर अनावश्यक गर्दी करु नये.
तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याची चूक आपल्याकडून घडू नये,
याची खबरदारी घ्यावी, तसेच कोरोना निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे.

Web Titel :- DGP Sanjay Pandey | if we take advantage police patience we will take action director general police sanjay pandeys

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट