DGP Sanjay Pandey | परमबीर सिंहासह ‘त्या’ 25 पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर गृह विभागानं घेतला ‘हा’ निर्णय, डीजीपींना केली ‘ही’ सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आणि ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याशी संबंधीत 25 अधिकाऱ्यांचे निलंबन (suspend) करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी गृह विभागाला दिला होता. मात्र, गृह विभागाने पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा हा प्रस्ताव फेटाळून (home department refuses Proposal) लावला आहे. यासंदर्भात चौकशी शिवाय कोणतीही कारवाई करणे योग्य नसल्याचे कारण देत गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यांच्या कसुरी आणि त्यांचावरील कार्यवाहीचा सविस्तर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना दिल्या आहेत. परंतु 15 दिवस होऊन देखील अद्याप प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून समजतेय.

परमबीर सिंह यांच्यासह भ्रष्टाचार (Corruption) व खंडणीचे (ransom) गुन्हे दाखल असलेले आणि त्यांच्या मर्जीतील तब्बल 25 अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याबाबतचा प्रस्ताव संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी गृह विभागाला सादर केला होता. यामध्ये 4 उपायुक्त (DCP) दर्जाचे व सहायक पोलीस आयुक्त (ACP) दर्जाचे अधिकारी व अन्य निरीक्षक (PI), एपीआय (API) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी परमबीर सिंह यांना निलंबित करण्याचे अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना (CM) आहेत. तर मपोसे दर्जाचे उपायुक्त, सहायक आयक्तांना निलंबित करण्याचे अधिकार गृह सचिवांना (Home Secretary) आहेत. तर निरीक्षक व त्याखालील दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार डीजीपी आणि पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police) आहेत. त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Gold Price Today | सोने खरेदीदारांना लागली लॉटरी, 10 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

… तोपर्यंत कारवाई करता येत नाही

परंतु, महाराष्ट्र राज्य सेवा नियम अधिनियमावलीनुसार कसूरी मध्ये एखादा अधिकारी दोषी आढळून येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येत नाही.
त्यामुळे याच आधारावर गृह विभागाने संजय पांडे यांनी सादर केलेला प्रस्ताव फेटाळला आहे.
संबंधितांवरील पूर्ण दोषारोप, त्यांच्या सहभागाबद्दलचे पुरावे, त्याबाबत केलेली प्राथमिक चौकशी इत्यादींची स्पष्टता करुन नव्याने प्रस्ताव सादर करण्याची सूचना डीजीपींना करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यांच्याकडून सांगितलेल्या पद्धतीने प्रस्ताव सादर झाल्यास त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

कोणावर कारवाई ?

निरीक्षक भीमराव घाटगे (Inspector Bhimrao Ghatge) यांनी परमबीर सह अन्य ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला,
त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करुन त्रास दिला ते, तसेच निरीक्षक अनुप डांगे (Inspector Anup Dange),
हॉटेल व्यावसायिक व क्रिकेट बुकींनी मुंबई व ठाण्यात दिलेल्या तक्रारीतील अधिकारी, अंमलदार यांचा यामध्ये समावेश आहे.

मॅट व न्यायालयाकडून दिलासा मिळू शकतो

संबंधित वादग्रस्त अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी किमान प्राथमिक चौकशी पूर्ण होणे किंवा गुन्हा दाखल,
गुन्ह्यात अटक होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना मॅट व न्यायालयातुन तातडीने दिलासा मिळू शकतो,
तसेच झाल्यास सरकारची नाचक्की होते, ती टाळण्यासाठी गृह विभागाने योग्य खबरदारी घेत आहे.

 

Web Title :-  DGP Sanjay Pandey | maharashrta home department refuses suspend parambir singh with those 25 officers notice send detailed report DGP Sanjay Pandey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांनाच निवडून द्या’ – अजित पवार

Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ