‘धडक’ची बॉक्स ऑफिस वर जोरदार ‘धडक’

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

मराठीतील रेकॉर्ड ब्रेक सुपरहिट सिनेमा ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक दिली आहे. पहिला-वहिला चित्रपट असणाऱ्या कलाकरांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘धडक’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८.७१ कोटींची भरघोस कमाई केली आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53a89850-8ce4-11e8-9aa0-4ddaf3d905d0′]

धडक सिनेमाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमध्ये चागंली कमाई केली आहे. असे असले तरी दिल्ली, पंजाब आणि मैसूर याठिकाणी सिनेमाला फारसे यश मिळालेले नाही. शनिवार आणि रविवारी मात्र हा सिनेमा आणखी जोराची धडक देईल असे बोलले जात आहे.

नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या जोडीची बॉलिवूडमधील एन्ट्री दमदार झाल्याचे सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईतून स्पष्ट झाले आहे. नवख्या ईशानच्या अभिनयाचं कौतूक होत आहे. जान्हवी आणि ईशानची फॅन फॉलोविंग फार नाही, मात्र तरीही कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना त्यांनी मागे टाकले आहे.