शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटनांकडून 22 डिसेंबर रोजी मुंबईत अंबानी इस्टेटवर धडक मोर्चा

पुणे- दिल्ली येथे सुरु असलेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांचे सर्व हातखंडे वापरून यश मिळत नाही म्हटल्यावर आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. त्याच प्रमाणे या आंदोलनात शामिल संघटना व पक्ष शामिल आहेत त्यांना लक्ष करून पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना बाबत महाराष्ट्रत आंदोलन उभा करण्याची घोषणा व रूपरेषे ची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. यावेळी सुभाष वारे, मोरे ताई, जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले कि, महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष व लोक संघर्ष मोर्चा यांच्या पूढाकाराने महाराष्ट्रातील शेतकरी कोरोनाचा काळ लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपातच परंतु केंद्र शासनाला धडकी भरेल अश्या भव्य संख्येने दि 22 डिसेंबरला मंगळवार रोजी मुंबईत धडकणार आहेत. महाराष्ट्रातील अजून संघटना ही यात सहभागी होतील आमची प्रमुख मागणी शेतकरी विरोधी तिन्ही कायदे, प्रस्तावित वीज बिल विधेयक हे तात्काळ रद्द व्हावेत हीच आहे.

ज्या कायद्याची मागणीच केली नाही ते कायदे सरकार जबरदस्ती लादले जात आहे. बाजारात कोणाला ही माल हमी भावा पेक्षा जास्त किंमतीत खरेदी करता येऊ नये. याची सक्ती सरकारने करावी व हमी भावाला सरंक्षण द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे.

हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकर्यांच आहे. एका राज्या चे नाही. प्रथमच देशात शेतकर्यांनी आंदोलन केले आहे. सरकार ने आम्हाला गुलाम करुन शेतकर्यांना संपवण्याचा प्रयत्न करु नये असे शेट्टी या वेळी म्हणाले.