जान्हवी आणि ईशान ‘या’ प्रश्नावर निरुत्तर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ६० कोटींचा पल्ला गाठला. चित्रपटातील दोघांच्या कामाचेही कौतुक झाले. पण  गेल्या आठवड्यात  प्रेक्षकांच्या भेटीस आलेला धडक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अतिशय जोरदार कामगिरी केली आहे. ‘धडक’नंतर आता कोणता चित्रपट करणार आहात या प्रश्नावर मात्र जान्हवी व ईशान निःशब्द होतात. नवा चित्रपट कुठला तर याचे उत्तर खुद्द जान्हवी आणि ईशान या दोघांकडेही नाही. अलीकडे झालेल्या एका ताज्या मुलाखतीत दोघांनाही त्यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल विचारण्यात आलं होत, पण या प्रश्नावर दोघेही निरूत्तर झालेले दिसले.

त्यानंतर जान्हवी म्हणाली कि, ‘धडक’नंतर नवा चित्रपट कुठला? असा प्रश्न आम्हाला वारंवार प्रत्येक मुलाखतीत विचारला जातो. पण हा प्रश्न आला की, आम्ही शांत बसतो.जान्हवी यावर मनमोकळेपणाने बोलली. सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत किंवा त्या प्रोजेक्ट वर काम सुरु आहे. डायरेक्टरसोबत चर्चा सुरू आहे, अशी वेगवेगळी उत्तर देताना मी अनेकांना पाहिले आहे. मला ही अशी रटाळ उडवाउडवीची उत्तर देणे थोडेसे विचित्र वाटते. त्यामुळे उगाच कुठला आव न आणता मी या प्रश्नावर शांत बसते, असे जान्हवी या मुलाखतीत म्हणाली. ईशानला हाच प्रश्न केल्यावर, सध्या या प्रश्नाचे माझ्याकडे कुठलेही उत्तर नाही,असे त्याने सांगितले.
[amazon_link asins=’B019XSHICW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5bffe94-93c9-11e8-924b-7d4cc5369ecd’]

काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार जान्हवीसाठी पापा बोनी कपूर स्वतः एक नवीन चित्रपट करणार आहेत. पण या गोष्टीबाबत जान्हवीने एक अवाक्षरही काढेल नाही. एकंदर काय तर जान्हवी व ईशान यांच्याकडे सध्या काम नाही, यापेक्षा जान्हवी व ईशान हे दोघेही इतरांपेक्षा वेगळे आहेत, पडद्यामागेही तितकेच सच्चे आहेत, हेच या मुलाखतीतून दिसले. ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनीही जान्हवीला एक चित्रपट आॅफर केल्याची चर्चा होती. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

जान्हवी व ईशानच्या ‘धडक’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ५८ कोटी १९ लाख रूपयांची कमाई केली आहे. अगदी कमी वेळात या चित्रपटाने खूप कमाई केली पण, ‘मिशन इम्पॉसिबल’ हा हॉलिवूड चित्रपट रिलीज झाल्याने ‘धडक’च्या कमाईवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.