जंगलात प्रेमाचे खासगी क्षण घालवत होतं ‘जोडप’, भामट्यांनी ‘मंगल’ कारस्थान केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका कपलच्या खाजगी आयुष्याबाबतचा एक व्हिडीओ बनवून त्यांना धमकी देणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्तीसगढ मधील धमतरी जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. व्हिडीओ मधील कपल हे शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. जंगलत फिरायला गेलेले असताना ते आपल्या खाजगी क्षणांमध्ये व्यस्त होते त्यावेळी काही तरुणांनी त्याबाबतचा व्हिडीओ बनवला त्यानंतर त्यांनी महिलेवर हल्ला देखील केला. त्यानंतर पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगरलोड येथील जंगलातील एक शिक्षक आणि शिक्षिकेच्या खाजगी क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी हा व्हिडीओ बनवणाऱ्या तीन ग्रामीण युवकांना गेल्या शनिवारी ताब्यात घेतले आहे. तिघांवर शिक्षिकेवर हल्ला तसेच ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

एक लाख रुपये मागितले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी कपलकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती, त्यानंतर या दोघांचे खाजगी क्षण असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Visit : Policenama.com