‘बुरा ना मानो होली है’, धनंजय मुंडेंची मोदी – शिवसेनेला कोपरखळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – धूलिवंदनाच्या मुहूर्तावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि शिवसेनेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत मुंडेंनी मोदींवर आणि शिवसेनेवर टीका केली आहे. धूलिवंदनाच्या शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींना एका कवितेतून चिमटा काढला आहे.

कभी तू फकीर लगता है, कभी आवारा लगता है, कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार लगता है… हमेशा अपना रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं! बुरा ना मानो होली है…”, असं म्हणत मुंडेंनी मोदींवर टीका केली आहे.

तर महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून ‘दमलेल्या बाबाला’, वाघ-शेळीचा खेळ खेळत वेळोवेळी आपले रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!, असं म्हणत शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी दिलेल्या कडव्या शुभेच्छा मोदी आणि शिवसेना कशाप्रकारे घेतील. तसंच भाजप त्यांना काय प्रत्युत्तर देते हे पाहावे लागेल.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us