हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.

नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात राज्यस्तरीय निषेध सभा सायंकाळी पाच वाजता होत आहे. ही सभा म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असा आरोप करत धनंजय देसाई यांनी या सभेला विरोध केला आहे. सभास्थळी जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले आहे.

धनंजय देसाई हे आज नगरमध्ये आहेत. त्यांनी ईदगाह मैदानात होत असलेल्या सभेला विरोध करत
जिल्हाधिकारी यांच्याकडे रॅलीला परवानगी मागितली होती. तोफखाना पोलिसांनी ती नाकारली. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी कोतवाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

फेसबुक पेज लाईक करा –