कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Dhananjay Mahadik | भाजपचे खासदार धनंजय महाडिक लाडक्या बहिणींवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. या वक्तव्यावर महाडिकांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलताना महाडिकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आघाडीच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि त्यांची नावे मला पाठवा आपण त्यांना धडा शिकवू, असे विधान केले होते. त्यानंतर धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
महाडिक यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची फिर्याद निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या सभेत त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा मागवला होता. मात्र, हा खुलासा अमान्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता धनंजय महाडिक यांच्यावर निवडणुकीची आचारसंहिता मोडल्याची फिर्याद दाखल करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.