बीड-लातूर नंतर धनंजय मुंडेंचे आता ‘मिशन गोंदिया’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

बीड-लातूर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदान संपताच विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ते या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चार सभांना संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या बीड-लातूर-उस्मानाबाद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बीड जिल्ह्याच्या दौ-यावर होते. सोमवारी या मतदारसंघातील मतदान संपताच ते सायंकाळी भंडाराकडे रवाना झाले. मंगळवार दिनांक 22 मे रोजी ते भंडारा जिल्ह्यात 2 तर बुधवार दिनांक 23 मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रचारसभांमधून मार्गदर्शन करणार आहेत. बीड-लातूर निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.