धनंजय मुंडे बनले ‘रघुभाई’ ; सोशल मीडियावर एकच चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडेंचा नवा लूक चर्चेचा विषय बनला आहे. वास्तव मधल्या ‘रघुभाई’ म्हणजे संजय दत्त सारखा लूक त्यांनी केला आहे. धनुभाऊचा लूक बघितला का ? अशी एकच चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.

लोकसभा निवडणूक जोरदार सुरु आहे. याचबरोबर विधानसभा निवडणुकीचेही वारे सुरु होत आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे महाराष्ट्र दौरा करत आहेत. नेहमी साधा-सरळ भांग पाडून कपाळी टीळा लावणाऱ्या धनंजय मुंडेंचा मात्र आज वेगळाच लुक पाहायला मिळाला. वास्तव मधल्या ‘रघु भाई’ म्हणजे संजय दत्त सारखा लूक त्यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या धनंजय मुंडेंचा हा व्हिलन टाईप लूक चर्चेचा विषय बनला आहे. इतकेच नव्हे तर, धनुभाऊचा लूक बघितला का ? धनु भाऊ सेम राघुभाई सारखे दिसायलेत. अशी एकच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

विशेष म्हणजे, याआधीही धनंजय मुंडेंनी आपले वाढलेले वजन कमी केल्याचे दिसत होते. आणि आता हा वास्तवमधील लूक त्यामुळे बदललेला लूक कोणासाठी इशारा तर नाही ना ? अशी चर्चा देखील होत आहे.

आज १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये बीड मतदार संघातील मतदानही आज होणार आहे. बीड मतदार संघातून भाजपकडून प्रीतम पुंडे तर आघाडी कडून बजरंग सोनावणे निवडणूक लढवत आहेत. आणि धनंजय मुंडेंनी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.