धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृतीबाबत दिली ट्विटरवरून माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   परळी बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास तसेच अनेक लोकांशी जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती.

यावेळी लॉकडाऊनच्या काळात कामकाज केलं होतं. त्याचा अहवाल त्यांनी कोरोना वाॅर्डमधून सादर केला होता. ते कोरोनावर यशस्वीरित्या मात करून आले. दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी कामाला सुरवात केली. आता पुन्हा एकदा मुंडे उपचारासाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली.

”उपचारासाठी आज मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे मी मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो असून लवकरच आपल्या सेवेत हजर होईल.”

कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडून डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. संजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खासगी सचिव १ सहाय्यक, दोन वाहनचालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्या सर्वांची दुपारी चाचणी निगेटिव्ह आली होती, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.