Dhananjay Munde | ‘मी कुणाला कळलोच नाही’ धनंजय मुंडेंच्या अजित पवारांना कवितेच्या खास शैलीतून शुभेच्छा.. (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज (22 जुलै) वाढदिवस होता. सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव अजितदादांना मिळत होता. तसेच, सोशल मीडियावरून देखील अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील अजितदादांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मात्र मुख्यतः म्हणजे अजित पवार यांचे खास असलेले धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) खास स्वरूपात कविता म्हणून अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय मुडेंनी (Dhananjay Munde) भावनिक शब्दांत कवितेच्या माध्यमांतून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी धनजंय मुंडे म्हणाले, ‘बोले तैसा चाले’ ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजित पवार यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ह्या शुभेच्छा मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या आहेत. तर स्वतः फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओही शेअर करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी एक कविता देखील धनंजय मुंडेंनी म्हटली आहे. दरम्यान, वाढदिवसादिनी अजित दादांबद्दल अनेक लेख वर्तमानपत्रात छापून येतील, पण मी कवितेतून (Poetry) दादांना शुभेच्छा देत आहे, असे धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) म्हटलं आहे.

‘मित्र कोण आणि शत्रू कोण कधीच साधे कळले नाही
नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही
सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही
ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही
केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळलो नाही
सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून पळलो नाही
पचवून टाकले दु:ख सारे, कधीच मी हरळलो नाही
आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही
कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही
रुसून राहिले अगदी माझ्या जवळचेच, मी कुणाला कळलोच नाही..!

या दरम्यान, धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) अशा भावनिक कवितेतून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या कवितेच्या कविचं नाव मी घेणार नाही, असं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Dhananjay Munde | ajit pawar dhananjay mundes special emotional poem ajit pawar his birthday occasion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे