बीडमध्ये मुंडे बहीण-भावात श्रेयवादाचं राजकारण सुरु

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कवच देणाऱ्या इन्शुरन्स कंपनीच्या नियुक्तीचा गोंधळ थांबायचं नाव घेत नाही. नियुक्त केलेल्या कंपनीकडून अद्याप विमा प्रीमियम भरुन घेतलेले नाहीत. अशातच पीक विमा कंपनीच्या नियुक्तीवरू जिल्ह्यात श्रेय वादाचे राजकारण सुरु झाले आहे.

बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आता आमने-सामने आले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूचा जिल्ह्यात कहर वाढत असताना अंबेजोगाई स्वाराती वैद्यकीय विद्यालायात, लोखंडचे कोविड रुग्णालय, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीट या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी पीएम केअर मधून जिल्ह्याला 38 व्हेंटीलेटर्स मिळाले आहेत. यावरून पालकमत्री आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे व्हेंटीलेटर्स भेटल्याचे पत्रक त्यांच्या कार्यालयातून देण्यात आले. मात्र, पीएम केअरमधून भेटलेल्या व्हेंटीलेटर्सचे फुकटचे श्रेय पालमंत्र्यांनी घेऊ नये, त्याऐवजी आपली धकम जिल्ह्याला पीक विमा कंपनी आणण्यात दाखवावी, असा टोला भाजपने लगावला आहे.