Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा ! 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – इयत्ता 10 वीच्या (Class 10th) परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीतील (scheduled-caste) आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारीसाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे 2 लाखांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू राहणार नाही. Dhananjay Munde announces rs 2 lakh grant to scheduled caste students who get more than 90 marks in 10th class examination

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निर्देश दिले होते.
बार्टीच्या 30 व्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या.
कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे.
या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) करणार आहे.
उत्पन्नाचा आणि जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य आहे.
विशेष म्हणजे या योजनेतील लाभार्थी संख्या अमर्यादित असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये (Barty’s Director General Dhammajyoti Gajbhiye) यांनी दिली आहे.

Web Title :- Dhananjay Munde announces rs 2 lakh grant to scheduled caste students who get more than 90 marks in 10th class examination

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव