धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. औरंगाबाद येथील न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थागिती दिली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिल साठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद दिली होती. त्यासंदर्भात आज कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

यासंदर्भात धनंजय मुंढे यांच्यासह १४ जणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. घेण्यात आलेली हि जमीन एका देवस्थानची असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे हि जमीन शासनाव्यतिरिक्त कुणीही हस्तांतरित करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परस्पर या जमिनीचा व्यवहार करत देवस्थानाबरोबरच शासनाची देखील फसवणूक आणि दिशाभुल केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती.

दरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी हा सत्याचा विजय झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी न्यायालयाचे या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला या निर्णयामुळे मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

सिने जगत –

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

 

You might also like