धनंजय मुंढे पोलिसांवर भडकले ! म्हणाले, जनतेची भिती आम्हाला नाही, मुख्यमंत्र्यांना

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी मतदारापर्यंत पोचण्यासाठी विविध यात्रांचे आयोजन केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा रविवारी माजलगाव येथे पोहचली असता तिथे मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी जमली होती. सभेला जमलेल्या तरुणांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव स्टेजजवळ बसण्यास प्रतिबंध केल्याचे पाहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पोलिसांवर चांगलेच भडकले. ते पोलिसांना म्हणाले, जनतेची भीती मुख्यमंत्र्यांना असू शकते आम्हाला नाही. कै. धर्मा पाटील यांच्या ६९ वर्षीय पत्नीलाही स्थानबद्ध करण्यात आले त्याचा संदर्भ घेत असे विधान केले. आम्ही जनतेतील नेते त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेमधील मावळ्यांना कोणाचीही भीती नाही.

तरुणांना डी झोनमध्ये बसू द्या
माजलगाव येथील शिवस्वराज्य यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत डी झोनमध्ये तरुणांना बसू देण्याचे नाकारले. परंतु त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून पोलिसांबद्दल प्रखर विरोध केला गेला. लागलीच हा प्रकार धनंजय मुंडे यांच्या लक्षात आला असता त्यांनी तरुणांच्या जमावाला तिथेच थांबवत त्यांच्या समोर पोलिसांना चांगलेच सुनावले. पोलिसांना सूचना देत कार्यकर्त्यांना डी झोन मध्ये बसू द्यावे असे पोलिसांना सांगितले.

प्रथमच मुंडेंच्या कुटुंबीयांची सभेला उपस्थिती
परळी मध्ये झालेल्या जाहीर सभेला मुंडेंच्या कुटुंबीयांची उपस्तिथी दिसून आली. यात मुंडेंची आई, पत्नी आणि अडीच वर्षाची आदिश्री ही देखील हजार होती. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता मुंडे कुटुंबातील सर्वच जण कामाला लागले आहेत. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे या देखील मतदार संघ पिंजून काढत आहेत.

मुंडेंची लेक चर्चेचा विषय
येथील अख्या सभेमध्ये धनंजय मुंडेंची छोटी मुलगी हिचीच जास्त चर्चा रंगली असल्याचे दिसून आले. स्टेज वर अजित पवार यांच्या शेजारी ऐटीत बसून खासदार कोल्हेंकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिले. यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहे. मुंडेंच्या मुलीचे नाव अनुश्री असे आहे. मुंडेंचे भाषण सुरु असताना तिच्या चेहऱ्यावरील गोंडस हास्य उपस्थितीतांना संमोहित करत होते. लोकं सभेत टाळ्या वाजवत असल्याचे पाहून ती छोटुकलीही टाळ्या वाजवू लागली. त्यामुळे ती आणखीनच चर्चेचा विषय ठरली. तसेच परळी शहरातील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत अतिथी येण्याअगोदर ती राष्ट्रवादीच्या गाण्यावर चांगलीच थिरकली.

आपल्या वडिलांचे भाषण सुरु असताना तिची स्टेजवर मस्ती चालूच होती. त्यामुळे सभेत तिची चांगलीच चर्चा रंगली. मुंडेंना एकूण तीन मुली आहेत. मुंडेंची लेक आदिश्री हि अवघ्या अडीच वर्षाची आहे. वडिलांच्या सभेला ती प्रथमच उपस्थित राहिली होती. या सभेत धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक अवाहन केले.

आरोग्यविषयक वृत्त –