बारामतीचा नाद करु नको शेलारा विजय आमचा सार्थ आहे : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेहमीच भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच विरोधी पक्ष नेते, धनंजय मुंडे यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातुन दोघांनीही एकमेकांवर टीकास्त्र सोडले आहे. आशिष शेलार यांनी पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळेंना दिलेल्या कर्जावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत मुंडेंनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालेले आहे, याचदरम्यान, बारातमी यंदा भाजपाच जिंकणार, बातमीसाठी एवढे पुरेसे आहे. आजोबांना आणि ताईंना कर्ज दिलेयं पार्थाने कशाला पाहतायं या व्यवहाराकडे नकारार्थाने? ताई म्हणतात, कुटुंबात होत असते असे! “तोंडी परिक्षा” घेणाऱ्यांनो बघा, उगाचचं तुम्हाला यात बातमी दिसे !

बारामती यावेळी भाजप जिंकणार ! बातमीसाठी तुम्हाला एवढे नाही का पुरेसे? असे ट्विट करत शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच विरोधी पक्ष नेते, धनंजय मुंडे यांनी शेलार यांच्या टीकेला उत्तर देत कमळाबाईचा संसार ब्रेक होण्याची नक्कीच येणार ब्रेकींग न्यूज, बारामतीचा झटका बसता, उडणार शेलार कंपनीचा फ्युज !. आजोबा ताई दादा नको रे, तुला पुरेसा आमचा पार्थ आहे. बारामतीचा नाद करु नको शेलारा विजय आमचा सार्थ आहे !! असे ट्विट करून धनंजय मुंडेंनी शेलार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.