Homeताज्या बातम्याDhananjay Munde | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या...

Dhananjay Munde | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल, प्रचंड खळबळ

परळी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा (Karuna Sharma) या परळीत (Parli) आल्या असता त्यांच्या गाडीमध्ये पोलिसांना पिस्तूल (Pistol) आढळून आले. यामुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात परळी पोलिसांनी करुणा शर्मा यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. करुणा शर्मा या परळीत येऊन पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार हे दावे सध्यातरी फोल ठरले आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तूल (Illegal pistol) आढळल्याने त्यांचा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्यांच्या कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान परळी शहरामध्ये अनेक महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर (city police station) दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्माने धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्याचा डाव आखला असल्याचा आरोप करुन करुणा शर्माला अटक (Arrest) करण्याची मागणी महिलांनी केली आहे. आता यावर परळी पोलीस (Parli police) कोणती करावाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

करुणापासून माझ्या जिवाला धोका- मुंडे

नेहमी धनंजय मुंडे यांना उध्वस्त करणार, संपवणार अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात (High Court) आणि फेसबुक वरील आपल्या पोस्ट मध्ये खुलासा केला होता.
वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुडेंच्या घरी जाणार असे स्वत: करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते.

करुणा शर्मा यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळून आल्याने त्या पिस्तुल घेऊन मुंडे यांच्या घरी कोणत्या उद्देशाने निघाल्या होत्या.
या प्रश्नाने परळीत खळबळ उडाली आहे.
मात्र आता करुणा शर्मा या परळीत पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडायला आल्या नव्हत्या, हे आता स्पष्ट झाले आहे.

Web Title : Dhananjay Munde | country pistol was found in car of karuna sharma in parali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला आईचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं समजलं, ब्रॉयफ्रेन्डच्या मदतीनं केलं असं काही…

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 278 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Fake Vaccines | ‘कोविशील्ड’-‘कोव्हॅक्सीन’ किंवा ‘स्पुतनिक-व्ही’ ! तुम्हाला दिली जात असलेली व्हॅक्सीन बनावट तर नाही ना? केंद्राने सांगितले कसे ओळखावे 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News