‘क्या से क्या हो गये देखते देखते’ ; धनंजय मुंडेंचा ‘या’ अभिनेत्याला टोला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – याला तर मी मनोज कुमार समजलो होतो, हा तर मोदींचा भक्त निघाला अशी टीका धनंजय मुंडेंनी अक्षय कुमारवर ट्विट द्वारे केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी एक मुलाखत दिली. ही मुलाखत बॉलीवूड मधील अभिनेता अक्षय कुमारने घेतली. अक्षयने मोदींना मुलाखती दरम्यान काही प्रश्न विचारले. हे सर्व प्रश्न मोदींच्या आयुष्यावर आधारित होते. काहींनी या मुलाखतीची स्तुती केली तर काहींनी जोरदार टीका देखील केली.

या मुलाखतीनंतर मुंडे यांनी अक्षय कुमारच्या विविध चित्रपटांचे फोटो आणि पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट केला. व त्यावर मुंडेंनी गाण्याच्या माध्यमातून म्हंटले कि ‘सोचता हू के वो कितने मासूम थे, क्या से क्या हो गए देखते देखते’. असा टोला मुंडेंनी ट्विट द्वारे मारला. आतापर्यंत मी अक्षयला जुनिअर मनोज कुमार म्हणायचो आणि हा तर मोदींचा भक्त निघाला. अरे ही मुलाखत होती की कौतुक सोहळा ? अशा भाषेत धनंजय मुंडेंनी अक्षयला टोला मारला.

सोशल मीडियावर मोदींविरोधात व्हायरल होणारे मिम्सचा मोदींना राग येतो का, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं आहे, यासह अन्य प्रश्न घेऊन तसेच त्यांच्या आयुष्याबद्दल अक्षयने मोदींसोबत मनमोकळा संवाद साधला.