धनंजय मुंडेंचं परळीकरांना ‘भावनिक’ आवाहन, लेकीला 2 वेळा दिला, यंदा लेकाला ‘आशिर्वाद’ द्या !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने विधानसभेची तयारी म्हणून शिवस्वराज्य यात्रेच्या दुसरा टप्प्यात पाथरी येथे भव्य सभा घेतली. त्यावेळी धनजंय मुंडेनी उपस्थितांना अशिर्वाद देण्याचे भावनिक आवाहन करताना सांगतिले की, आगामी विधानसभा माझ्यासाठी जीवन मरणाची आहे. मागील 24 वर्षात आम्ही तुमची प्रामाणिक सेवा केली. सर्वांच्या सुख दु:खात सहभागी झालो. हात अखडता घेतला नाही. 100 एकरची जमीन विकून तुमची सेवा केली, लेकीला दोनवेळी अशिर्वाद दिला, यंदा लेकाला आशिर्वाद द्या.

गोपीनाथ मुंडेंची इच्छा अपूर्ण –
गोपीनाथ मुंडेंची इच्छा अपूर्ण राहिली असे म्हणताना ते म्हणाले, परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले आणि परळीची दशा झाली. जायकवाडीचे पाणी धरणात यावे ही स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची इच्छा होती. त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता दिली. मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली. परळीत एमआयडीसीसाठी मी प्रयत्न केले मात्र सत्ता असून आणि उद्योगपतींशी ओळख असून पालकमंत्र्यांना माझ्या भावांसाठी रोजगार आणता आला नाहीत, अशी सडकून टीका मुंडे यांनी पालकमंत्र्यांवर केली.

पंकजा मुंडेंना सवाल –

परळीत व्यवसाय का आणले नाहीत असे सवाल धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना विचारला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी दिवंगत मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. पण सिरसाळात 2200 एकर जमीन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिले. अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आला, त्यांच्या अनेक उद्योगपतींची ओळख आहे.

आरोग्यविषयक वृत्त –