‘चर्चा’ फक्त धनंजय मुंडेंच्या ‘लेकी’ची, तिनं खा. अमोल कोल्हेंना नक्की काय दाखवलं ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या चर्चा आहे ती अमोल कोल्हे यांच्या मांडीवर बसलेल्या लहानग्या गोंडस मुलीची. याला कारण देखील तसच आहे. कारण ही लहानगी आहे धनंजय मुंडेंची मुलगी. ही लहानगी अमोल कोल्हेंना भाजप सरकारला आसमान दाखवा असे सांगत असल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे धडाकेबाज भाषण देत होते. याचवेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या शेजारी बसलेल्या अजित पवार यांच्या पाठीवर हात ठेवत केलेले गोंडस हस्य करणाऱ्या मुलीची चर्चा सोशल मिडियावर रंगली. परळीत जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचे कुटूंब पहिल्यांदाच उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांच्या आईसह, पत्नी आणि मुलगी देखील उपस्थित होते. परंतू आकर्षणाचा विषय ठरली ती धनंजय मुंडे यांची गोंडस मुलगी.

धनंजय मुुंडे यांच्या सर्वात लहान मुलीने म्हणजेच आदिश्री फक्त अडीच वर्षांची आहे. परंतू तिने पहिल्यांदाच वडिलांचे भाषण जाहीर सभेत ऐकले. राष्ट्रवादी सध्या विधानसभांसाठी शिवस्वराज्य यात्रेचा नारळ फोडला आहे. याचा दुसरा टप्पा परळीत होता. याच वेळी स्टेटवर येण्याआधी आदिश्रीने राष्ट्रवादीच्या गाण्यावर डान्स करत आनंद लुटला. त्यानंतर ती धनंजय मुंडे यांच्याकडे हात करत होती. त्यानंतर स्टेजवर आल्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी तिच्याकडे हातवारे केले. नंतर ती थेट अजित पवारांच्या शेजारी जाऊन बसली. यामुळे परळीत चर्चा रंगली ती धनंजय मुंडे यांच्या मुलीची.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like