भाजपला ‘हरवलं’, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास’चा पहिला सरपंच

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपला सत्तास्थापनेपासून रोखण्यात महाविकासआघाडीला यश आले. त्यानंतर राज्यातील सत्तापेच सोडवत महाविकासआघाडीने सत्तास्थापन केली. राज्य स्तरावर तर महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला परंतू स्थानिक स्वराज्य संस्थेत काय होईल याबाबत संभ्रम होता.

परंतू आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकासआघाडीला यश मिळाले. ग्राम पंचायतीत महाविकासआघाडीचा पहिला सरपंच निवडून आला. राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या शिरसाळा ग्रामपंचायतीत हा मोठा विजय मानला जात आहे. महाविकासआघाडीच्या उमेदवार म्हणून आश्रूबाई विश्वनाथ किरवले यांना पहिल्या सरपंच पदाचा मान मिळाला.

आश्रुबाई यांचे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत अभिनंदन केले. यात ते म्हणाले की परळी मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलंय. परळी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी काल रविवारी पोटनिवडणूक झाली. काल सरपंच पदासाठी परळीतील सर्वात मोठी असलेली सिरसाळा ग्रामपंचायतीत निवडणूक पार पडली.

धनजंय मुंडेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीच्या वतीने आश्रुबाई किरवले या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तिन्ही पक्षांनी मिळून सिरसाळामध्ये सरपंच पदासाठी उमेदवार दिला. त्यांनी भाजपच्या उमेदवार आशाबाई कपिल चोपडे यांचा 1395 मतांनी पराभव केला.

Visit : Policenama.com

 

You might also like