Dhananjay Munde | पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडेंनी दिले मार्मिक उत्तर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत विद्रोहात सामिल झालेल्या सर्वांनाच मंत्रिपदाची आस आहे, असे विरोधी पक्ष म्हणत आहे. पण एकनाथ शिंदे यांनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) अनेकांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे अनेक जण नाराज देखील आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात नाराज आमदारांसह भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) देखील आहेत. त्यांना मंत्रिपद मिळणार का, यावर त्यांचे बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिले आहे. भाजप मला विचारुन मंत्र्यांची यादी ठरवत नाही, असे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

 

पंकजा मुंडे यांनी यापूर्वी देखील मंत्री म्हणून काम केले आहे. मात्र, यापुढे त्या कसे काम करतील याबाबत मला कल्पना नाही. मला हा प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनाच काम करायचे की नाही, हा प्रश्न विचारायला हवा. भाजप मला विचारुन मंत्रिपदाची यादी ठरवत नाही. यादीत कोणाला स्थान दिले जावे, हे मला विचारले जात नाही. तसे असते तर मला फार आनंद झाला असता, असे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

 

यावेळी मुंडे यांनी अतिवृष्टीवर (Heavy Rain) देखील भाष्य केले. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे (Rain in Maharashtra) मोठे नुकसान झाले आहे.
मागील नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. यंदा झालेल्या पावसाचे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत.
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. राज्यात एकतर मंत्रिमंडळ उशिरा झाले.
त्यात पालकमंत्री देखील बराच काळ नव्हते. शेतकऱ्यांची व्यथा पाहण्यासाठी कृषीमंत्री तर नाहीच,
पण दुसरा मंत्री देखील इकडे फिरकला नाही. राज्यात नवीन आलेले सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत आलेले नाही,
तर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले आहे, अशी आगपाखड धनंजय मुंडे यांनी केली.

 

Web Title :- Dhananjay Munde | dhananjay munde comment on pankaja munde possibility of getting ministerial post in eknath shinde cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | भिडे यांच्याबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिली नवीन माहिती

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त