पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्यात शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, या सरकारचे कृषीमंत्री (Agriculture Minister) तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरताना दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) केली आहे. तसेच हे सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले असून त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, असा टोलाही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. यामुळे शेतमालावर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे. काही ठिकाणी जुनी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. तर काही ठिकाणी अद्याप पंचनामे व्हायचे बाकी आहेत, असे आरोप मुंडे (Dhananjay Munde) यांनी यावेळी सरकारवर केले.
मागील वर्षी देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) मदत केली होती.
यावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले, पण कोणतेच मंत्री दखल घेत नाहीत.
शिधा वाटपाची घोषणा सरकारने केली. पण नुसत्या गोड गोड घोषणा सरकार करत आहे.
प्रत्यक्षात शिधा कोणालाच मिळाला नाही. अनेक ठिकाणी 65 मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे,
तरी देखील पंचनामे झाले नाहीत. जिल्ह्यांना पालकमंत्री उशिरा नेमल्याने पीक विमा कंपनी शेतकऱ्यांची दखल घेत नाही. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, असे मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्यात झालेल्या पावसाने फक्त कापूस आणि सोयाबिन पिकांना नाहीतर फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे.
तोडणीला आलेल्या मोसंबीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत, असे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितले.
Web Title :- Dhananjay Munde | dhananjay munde criticism on state govt for loss agriculture crop
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune News | विधायक कार्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे; रत्नाकर गायकवाड यांचे मत