Dhananjay Munde | केज नगर पंचायतीत धनंजय मुंडेंना जोरदार धक्का; भाजप काँग्रेसच्या साथीने करणार सत्ता स्थापन

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या केज नगर पंचायत निवडणुकीत (Kej Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धंनजय मुंडें (Dhananjay Munde) प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र, या निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नाही. परंतु, आता भाजप (BJP) पुरस्कृत जनविकास आघाडीने (Janvikas Aghadi) काँग्रेस (Congress) सोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्यामुळे मुंडेंना (Dhananjay Munde) जोरदार धक्का बसला आहे.

 

काँग्रेसचे आदित्य पाटील (Aditya Patil) व जनविकास आघाडीचे हारून इनामदार (Aaron Inamdar) यांनी पत्रकार परिषदेत (Press conference) माहिती देताना सांगितले की, केजच्या विकासासाठी खासदार रजनीताई पाटील (MP Rajnitai Patil) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी एकत्र आली असून नगरपंचायतीमध्ये (Nagar Panchayat) सत्ता स्थापन करणार आहे. आम्ही ‘आपलं गाव आपलं सरकार’ ही संकल्पना घेऊन विकास कामे करू असे सांगितले. यावेळी अंकुशराव इंगळे (Ankushrao Ingle), पशुपतीनाथ दांगट (Pashupatinath Dangat), प्रकाश भन्साळी (Prakash Bhansali), शकील इनामदार (Shakeel Inamdar), दिलीप गुळभिले (Dilip Gulbhile), हाजी मौला सौदागर (Haji Maula Saudagar) यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

केज नगरपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्ह्य अध्यक्ष बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. निवडणुकीत जनविकास आघाडी ८, राष्ट्रवादी ५, काँग्रेस ३ तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्तेचा पेच निर्माण झाला होता. मात्र राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहेत.

 

Web Title :- Dhananjay Munde | dhananjay munde defeated kej nagar panchayat election congress forms alliance with bjp in beed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा