Dhananjay Munde | ‘2009 ला मला निवडणूक लढवू दिली असती तर…’, पंकजा मुंडे यांच्या ‘त्या’ टीकेला धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होत असतं. त्यातच आता परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Assembly Constituency) जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामाच्या मुद्यावरुन या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला होता. तुम्ही जर मला 2019 ला निवडून दिलं असतं तर वेगळं चित्र असतं असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत कामाचा शुभारंभ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी दोन्ही बहिणींवर टीका केली. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगावरुन खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना टोला लगावला. 2009 मध्ये जर मला निवडणूक लढवू दिली असती तर मतदारसंघ 15 वर्षात पुढे गेला असता असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना टोमणा मारला.

 

https://www.facebook.com/photo?fbid=757657632384005&set=pcb.757657779050657

 

काय म्हणाले धनंजय मुंडे?

काशी विश्वनाथाचं (Kashi Vishwanath) जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे आहे. खासदारांना हे माहित हवं होतं. तर शिरसाळा येथील एमआयडीसी (Shirsala MIDC) वरुन बहिण पंकजावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले, मी आणलेल्या एमआयडीसीत एक उद्योग आणून दाखवा, मी स्वत: रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेल, असं आव्हान त्यांनी पंकजा यांना दिले. 2009 ची विधासनभा निवडणूक लढवून दिली असती तर आज मतदारसंघ 15 वर्षे पुढे विकासात गेला असता. बारामती, इस्लामपूरपेक्षाही जास्त विकास मतदारसंघाचा झाला असता. दहा वर्षे तुम्ही सत्तेत होता मंत्री झालात मग या भागाचा विकास का केला नाही? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

 

हजारो कोटींचा प्रकल्प दुसरीकडे गेला

पंकजा मुंडे यांना आव्हान देताना धनंजय मुंडे म्हणाले, राज्यासह देशात आपली सत्ता आहे.
मग तुम्ही शिरसाळा एमआयडीसी मध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवाच असं आव्हान त्यांनी पंकजा मुंडे यांना दिले.
वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) तयार करण्याचा कारखाना हातातून निसटला.
हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शरमेची बाब असल्याचे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली यावरुन त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.
देशात लोकशाहीची गळचेपी सुरु असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :  Dhananjay Munde | dhananjay munde strong criticism of pankaja munde in beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा