‘तू याद बहुत आयेगा, तो मै क्या करुंगा?; निधन झालेल्या मित्रासाठी धनंजय मुंडेची भावूक पोस्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याचे सामाजिक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या महाविद्यालयातील मित्राच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. अ‍ॅड. अनंत पाटील नावाच्या मित्र आपल्यातून निघून गेलाय. हे दु:ख पचवणं खूप कठीण आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सिम्बॉयसिस महाविद्यालयामध्ये शिकायला असताना पहिल्या लेक्चरला भेटलेला पहिला मित्र तरुण वयात अनेक आठवणी ठेऊन निघून गेलाय. अनंता तुला विसरण आणि हे दु:ख पचवणं कठीण आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. ‘तू याद बहुत आयेगा, तो मै क्या करुंगा…? असा प्रश्नार्थ भाव त्यांचे मित्राविषयचे प्रेम सांगून जात आहे.

 

 

 

 

 

 

अनंत पाटील यांचे आई-वडील, पत्नी व सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तरुण वयात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख पचवण्याची कुटुंबीयांना शक्ती देवो, अशी प्रार्थना करत मुंडे यांनी अनंत पाटील यांना श्रद्धांजली वाहिलीय.

काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याने राज्यात खळबळ माजली होती. रेणू शर्मा नावाच्या बॉलिवूड गायिकेनं त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. या प्रकरणात अनेक मुद्दे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडेंना अभय दिल्याचे पाहायला मिळलंय. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जनता दरबारच्या माध्यमातून आपल्या कामाचा धडाका पुन्हा सुरु केलाय. सोशल मीडियावरील त्यांची मित्राविषयी लिहिलेली पोस्ट व्हायरल होतेय.