शरद पवारांच्या ‘गंभीर’ विधानानंतर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पवारांच्या या विधानानंतर मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय पवार साहेब आणि पक्ष जे ठरवेल ते, असे मुंडे म्हणाले. मुंडे हे जनता दरबारासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आले आहेत. जनता दरबार संपल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत.

काय म्हणाले शरद पवार ?
धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, असे शरद पवार म्हणाले आहेत. मुंडे यांनी माझी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मुंडे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. या संदर्भात मुंडेनी दिलेली माहिती पक्षासमोर मांडेन. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंवर काय आहेत आरोप ?
धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुल झाली आहेत, याची कबुली दिली, तसेच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडे यांनी या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर माहिती लपवल्याचाही आरोप आहे.