राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे कालपासुन नॉटरिचेबल, काही दिवसांपुर्वी भेटले होते मुख्यमंत्री फडणवीसांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता पदाची शपथ घेतली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते सुरूवातीपासुनच भाजपासोबत जावं असं सांगत होते. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खंद्दे समर्थक आहेत. काल (शुक्रवार) पासुन धनंजय मुंडे हे नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे ते शरद पवारांसोबत आहेत की अजित पवारांसोबत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची काही दिवसांपुर्वी पुण्यात बैठक झाली होती. त्यावेळी काही मोजक्या नेत्यांनी राष्ट्रवादीनं भाजपासोबत जावं असं सुचवलं होतं. मात्र, आघाडी स्थापन करून शिवसेना आणि काँग्रेससह सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्यानं राष्ट्रवादीनं त्या नेत्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं.

आता मात्र अजित पवार आणि त्यांचे समर्थक भाजपाच्या गळाला लागले आहेत. धनंजय मुंडे देखील भाजपासोबत जाणार का असा प्रश्न आता समोर आला आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होवु शकलेला नाही. धनंजय मुंडे हे कालपासुन नॉटरिचेबल आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Visit : Policenama.com