Dhananjay Munde-Karuna Sharma | ‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर सिनेमा काढला तर…’; करूणा शर्मांच्या वक्तव्याने खळबळ !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde-Karuna Sharma | करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur North Assembly By-Election) उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी पंढरपूरमध्ये (Pandharpur) केली आहे. मात्र यावेळी बोलताना करूणा शर्मा (Dhananjay Munde-Karuna Sharma) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

 

राजकारण कसं चालतं हे मी गेले 25 वर्षे पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणावर, धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट (Movie) काढला तर तो सुपर डुपर चालेल, असं करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणुक लागली आहे. (Dhananjay Munde-Karuna Sharma)

 

या जागेसाठी काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आम आदमी पार्टीही (AAP) उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये आता करूणा शर्माही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

दरम्यान, करूणा शर्मा यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचं नाव शिवशक्ती (Shivshakti) सेना असं आहे.
मला अनेक पक्षांनी प्रवेशाच्या ऑफर केल्या होत्या. मात्र मला माझा पक्ष (Party) स्थापन करायचा होता,
कारण माझ्यासारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहेत त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात असल्याचा दावाही करूणा शर्मा यांनी केला होता.

 

Web Title :- Dhananjay Munde-Karuna Sharma | karuna sharma dhananjay munde and my movie will do well statement by karuna sharma in solapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi First Audition Video | नोरा फतेहीचा ऑडिशनचा 10 वर्षा आधीचा व्हिडिओ आला समोर; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..

 

Modi Government | भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो? मोदी सरकारने स्पष्टच सांगितले….

 

Aamir Khan on The Kashmir Files | ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आमिर खाननं मांडलं मत; म्हणाला – ‘जे कश्मीरी पंडितांसोबत झालं, ते…’