धनंजय मुंडे 6018 मतांनी आघाडीवर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – परळीतून धनंजय मुंडे 6018 मतांनी आघाडीवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. परळीत बहिण भावाची लढाई रंगली आहे. अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही लढत आहे. हे दोघे बहिण भाऊ असले तरीही ही निवडणूक दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. परळीतून धनंजय मुंडे यांनी 6018 मतांची आघाडी घेतली आहे. पंकजा मुंडे या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत.

परळीतून धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिले कल जे हाती येत आहेत त्यानुसार धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. हा अंतिम निकाल नाही मात्र सध्या तरी धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. आता नेमकं काय होणार ते निकालानंतर स्पष्ट होईलच. धनंजय मुंडे यांनी केलेलं विधान आणि त्यावरुन रंगलेलं अश्रूंचं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलं आता नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकजा मुंडे आणि धंनजय मुंडे यांच्यात या ठिकाणी काट्याची टक्कर असून यामध्ये दोघांनीही विजयासाठी जोर लावला होता. मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी धंनजय मुंडे उत्सुक असून पुढील फेऱ्यांमध्ये काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com