हिंजवडीतील त्या पिडीत मुलींच्या कुटुंबियांची ना.धनंजय मुंडेंनी घेतली भेट

पुणे:पोलीसनामा ऑनलाईन

तुमच्या कुटुंबियांवरचे दुःख मोठे आहे, मात्र धीर सोडु नका, आमच्या भगिणींवर अत्याचार करणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा भाऊ स्वस्थ बसणार नाही अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी आज हिंजवडी येथील त्या पिडीत मुलींच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच या कुटुंबास एक लाख रूपयांची रोख स्वरूपात मदतही केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2980a912-c339-11e8-9636-57ae618061aa’]

पुण्या जवळीत हिंजवडी परिसरात राहणार्‍या एका बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे समाजात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत असुन आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी हिंजवडी येथे त्या पिडीत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांना धीर दिला. त्या मुलींच्या शिक्षणासाठी एक लाख रूपयांची रोख स्वरूपात मदत केली तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांना दुरध्वनीवरून या घटनेतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा अशी सुचना केली.

आता तनुश्री- नाना पाटेकरच्या वादात उतरले ‘हे’ कलाकार

सदर घटना हि अतिशय संतापजनक असुन या राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नाही. शाळेत जाणार्‍या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया व्यक्त करतांनाच या प्रकरणी आपण आरोपींवर कठोरात-कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आगामी अधिवेशनातही कायदा व सुव्यवस्थेचा तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अडचणी, त्यांच्या समस्या, ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा, ऊसतोड कामगार महामंडळ आदी प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c67b8b9-c339-11e8-836a-d91088c125e7′]

कुटुंबिय गहिवरले
ना.धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सदर कुटुंब गहिवरून गेले होते. आमच्या या संकटाच्या समयी आपण भाऊ म्हणुन धीर देण्यासाठी आला आहात आता आम्हाला तुमचाच आधार आहे. या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसु नका अशी भावनिक साद त्यांनी घातली.