Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार, म्हणाले-‘मी कमिटमेंट देत नाही, हीच आमची…’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या नेत्या (BJP leader) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला धनंजय मुंडे यांनी उत्तर देत पलटवार केला आहे. मी जे कमिटमेंट देते, ते पूर्ण करते असे म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना टोला लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, आमचा जन्म त्या मातीत झालेला आहे. मातीतल्या माणसांसाठी काम करत राहणे हीच आमची कमिटमेंट (Commitment) असल्याचे मुंडे म्हणाले.

 

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची परभणीच्या (Parbhani) पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते आज (सोमवार) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, ज्या कोणी कमिटमेंट दिल्या आहेत, त्या कमिटमेंट पूर्ण झाल्या आहेत की नाहीत, हे शोधणे पत्रकारांचे काम आहे. तुम्ही स्वत:च तिथे जा आणि माहिती घ्या, निधी (Fund) कोणी दिला, किती दिला. मग तुम्हाला समजेल आणि मी कमिटमेंट देत नाही, आमचा जन्म त्या मातीत झालेला आहे. मातीतल्या माणसासाठी काम करत राहण, हीच आमची कमिटमेंट असल्याचे मुंडे यांनी म्हटले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, पालकमंत्री म्हणून परभणी जिल्ह्याने मला स्विकारले, हे महत्त्वाचे आहे.
आपण पालकमंत्री म्हणून बीड (Beed) आणि परभणी जिल्ह्यात फरक करणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मागील दोन वर्षामध्ये इतर जिल्ह्याप्रमाणे या जिल्ह्यात देखील निधीअभावी मोठ्या प्रमाणात कामे रखडली आहेत.
कोरोना आपत्तीमुळे (Corona Disaster) सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. मागच्या दोन वर्षात केवळ आरोग्य विभागावर (Health Department) लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. माणसांचे जीव महत्त्वाचे होते. त्यामुळे सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करुन खर्च केला. मात्र, आता आपण या संकटातून बाहेर पडलो आहोत. निर्बंध (Restrictions) हटवण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामांना निश्चित पैसे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Dhananjay Munde | minister of social justice dhananjay munde gives reply to bjp leader pankaja munde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा