नशा दौलत का ऐसा भी क्या दानवेसाहेब…! धनंजय मुंडेंच्या दानवेंना कानपिचक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- “तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी तुम्हाला पैसे देईन” असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे, त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘नशा दौलत का ऐसा भी क्या दानवेसाहेब की तुम्ही लोकशाहीच विकत घ्यायला निघाले’ ? अशा शब्दात दानवेंच्या कानपिचक्या घेतल्या आहेत. मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून अशा आशयाची पोस्ट केली आहे. असे ट्विट करीत निवडणूक आयोगाकडून करवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की ,”नशा दौलत का ऐसा भी क्या दानवेसाहेब की तुम्ही लोकशाहीच विकत घ्यायला निघाले? पूर्ण मराठवाड्यात तुमच्या ‘चकव्यां’ची ख्याती आहे, तुम्ही काय लोकांच्या मतांना विकत घेणार ! निषेध… निवडणूक आयोगाने दानवेंवर कारवाई करावी”.

नक्की काय म्हणाले दानवे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वाद यांचे एकच समीकरण आहे असे दिसते आहे . कारण ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले’, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे दानवे आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडणार असे दिसते आहे. करणं त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जालना येथील सभेदरम्यान बोलताना त्यांनी ” तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी तुम्हाला पैसे देईन असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असे दिसते आहे.

आपल्या मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर दानवे सभेला संबोधताना म्हणाले की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधक एकत्र झाले आहेत आणि मला पराभूत करण्यासाठी जालन्यामधील विरोधक एकत्र झाले आहेत. आता तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी, तुम्हाला पैसे देईन.” असे वक्तव्य दानवे यांनी केले.

दानवे वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही चर्चेत
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी याआधीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ”साले” संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफैर टीका झाली होती.

जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला होता. ”एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा,” अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली होती.