Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाकडून मिळाला मोठा दिलासा !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मोठा दिलासा मिळाला आहे. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने (Ambajogai Civil Court) तालुक्यातील पूसयेथील साखर कारखान्याच्या जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणात मुंडेंना जामिन मंजूर (Bail Granted) झाला आहे.

 

2018 साली धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये (Bardapur Police Station) जमीन प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंजा गित्ते यांनी तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी वॉरंट निघाल्याने धनंजय मुंडे यांनी न्यायालयासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी मुंडे यांच्यावतीने ॲड. अशोक कवडे यांनी कामकाज पाहिले.

 

अंबाजोगाईमधील पूस गावात जगमित्र साखर कारखाना (Jagmitra Sugar Factory) प्रस्तावित होता.
हा साखर कारखाना सुरू करण्यासाछी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या काळात शेकडो एकर जमीन विकत घेतली आणि यासाठी शेतकऱ्यांकडून 25 कोटींचं भांडवलही उभं केलं. परंतु साखर कारखाना सुरू झाला नाही.
यामध्ये मुंडे यांनी पूस गावामधील बेलखंड मठाची (Belkhand Math) 25 एकर जमीनही घेतली.

 

ही जमीन बेलखंड मठाला इनाम म्हणून मिळाली होती त्यामुळे या जमीनीचा व्यवहार होऊ शकत नव्हता.
मात्र बेकायदेशीरपणे ही जमीन विकत घेण्यात आली आणि मुंडे अडचणीत सापडले.

 

Web Title :- Dhananjay Munde | NCP leader and minister dhananjay munde ambajogai court grants bail to dhananjay munde in jagmitra sugar factory land misappropriation case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Crime | धक्कादायक ! युट्यूबवर व्हिडीओ पाहून 5 महिन्यांच्या 17 वर्षीय गर्भवती तरूणीनं केला गर्भपात

 

Tata Group Stock | टाटाच्या ‘या’ कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 18 लाख, जाणून घ्या

 

Rahul Gandhi-Pushpa Munjiyal | काय सांगता ! होय, 78 वर्षाच्या महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, जाणून घ्या