मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखती दरम्यान बोलताना भाजप नेत्या (BJP) आणि माजी मंत्री पंकजा मुंडेबाबत (Pankaja Munde) एक सुचक वक्तव्य केलं आहे. ‘रुसून राहिले अगदी माझ्या जवळचेच, मी कुणाला कळलोच नाही,’ असं म्हणत माझं आणि पंकजाताईचं जेवढं जमलं किंवा जमत होतं, तेवढं मला वाटत नाही की अन्य कुणाचं जमलं असेल. पंकजा मुंडे आणि आमचे संबंध सुधारतील, असं मला वाटत नाही, असे धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्द उद्गगारले आहेत.
त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, ‘भाजपला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आम्ही जेव्हा राजकीयदृष्ट्या वेगळे झालो, त्यानंतर जे काही घडलं, ते काही सार्वजनिकरित्या सांगण्यासारखं नाही. परंतु, 2009 पूर्वी पंकजाताई आणि माझं बहीण-भावाचं नातं हे खूप घट्ट होतं. रक्षाबंधनाला सर्वप्रथम पंकजाताई आणि प्रीतमताईंकडून राखी बांधून घ्यायचो. मगच सख्ख्या बहिणी राखी बांधायच्या. अगदी भाऊबीजेलाही हीच बाब घडायची. अगदी कळतं वय नसल्यामुळे हे चालत आलं होतं.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आमच्या कुटुंबात माझे वडील सगळ्यांत मोठे होते.
त्यानंतर मी आहे. कुणी मानलं नाही, तरी घरात मी मोठा आहे.
त्यामुळे स्वाभाविकपणे घर एकत्र राहिलं पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असतो.
घर हे राजकारणापलीकडे आहे, असं मी समजतो. त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकत्र असावेत.
एकोप्याने राहावेत, असं मला कायम वाटतं. भले घरात 2 पक्षांचे विचार असतील. एकमेकांविरोधात निवडणूक लढायची असेल, तरी लढू शकतात.
मात्र, घर म्हणून सुख आणि दुःखात, सर्व गोष्टीत जो संवाद असायला हवा, तो नाही, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, ‘बहीण-भावंडांमध्ये पंकजाताई (Pankaja Munde) आणि माझं जेवढं जमत होतं.
मला वाटत नाही की, अन्य कुणाचं जमत होतं किंवा जमलं असेल. सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांना मनमोकळेपणाने सांगायचो.
खुलेपणाने शेअर करायचो. 2009 पर्यंत आमचे फार चांगले संबंध होते. पण, त्यानंतर काही फारसं चांगलं राहिलं नाही.
अनेकदा मीही प्रयत्न केला. माझे वडील गेल्यानंतर तसेच गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला.
घर एकत्र ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केला. मात्र, त्यात मला यश आलं नाही. भलेही तुम्ही राजकारण वेगवेगळं करा.
पण घर एकत्र ठेवून त्या पद्धतीने काही करता येतं का, यासाठी प्रयत्न केले,’ असं धनंजय मुंडे यांनी म्हटले.
Web Title :- Dhananjay Munde | ncp leader and minister dhananjay munde speak over relation pankaja munde in one interview of daily news paper in maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा