Dhananjay Munde | CM शिंदेंनी स्वत:चाच निर्णय फिरवल्यावरून धनंजय मुंडेंचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी चौफेर घेरले आहे. सत्ताधारी पक्षाकडून झालेल्या चुका विरोधक सातत्याने सभागृहात मांडत आहेत. नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्यावा, यासंदर्भातील विधेयकावरून आज राष्ट्रवादीचे नेते (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. या विधेयकावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चांगलेच कैचीत पकडले होते. नगराध्यक्ष (Mayor) हा थेट जनतेतून निवडण्यात यावा या विधेयकाला विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध केला.

 

स्वतःचाच निर्णय बदलावा लागतो हे दुर्दैव
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना बदलावा लागतो, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणार्‍या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये, असा खोचक टोला मुंडे यांनी लगावला.

 

हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण
ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री (urban Development Minister) असताना एकनाथ शिंदे यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा, असा निर्णय तत्कालीन मंत्रिमंडळात (Cabinet) मांडून मंजूर केला होता. मात्र सत्ता बद्दलताच मुख्यमंत्र्यांनी स्वतःच घेतलेला निर्णय स्वतःच बदलला आहे, हे ऐकनाथ झाल्याचे लक्षण आहे.

 

त्या नगरसेवकांच्या आशेवर पाणी
मुंडे म्हणाले, आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो.
अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत.
मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवले, असे म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

 

Web Title :- Dhananjay Munde | ncp leader dhananjay munde on cm eknath shinde in vidhansabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंजिनिअर पतीवर काळी जादू केल्याप्रकरणी उच्चशिक्षित पत्नीविरुद्ध फौजदारी गुन्हा

 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंना अपघातानंतर वेळेवर मदत का मिळाली नाही? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

 

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे