Dhananjay Munde | धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी ! ‘आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde | नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेमधून व्हावी, यासाठी घटनादुरूस्तीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने आज मांडण्यात आला आहे. या प्रस्तावार बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावरून खोचक टोले लगावताना, अचानक जेव्हा मुंडे यांच्या लक्षात आले की, अजित पवार (Ajit Pawar) सुद्धा महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अजित पवार यांची मध्येच माफी मागत पुन्हा आपली धुवाँधार बॅटिंग सुरूच ठेवली.

 

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) खोचक टोले लगावताना म्हणाले, तुमच्या मनातील दु:ख काय आहे? बाकी कुणीही ओळखू शकत नसले तरी मी ओळखतो. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून भाजपाने काय मिळवले? तेच मला कळत नाही. यापूर्वी ते कमीत कमी ‘विरोधी पक्षनेते’ या संविधानिक पदावर होते. आता ते उपमुख्यमंत्रीपदावर आहेत, पण हे पद संविधानिक नाही.

 

यावेळी उपमुख्यमंत्री पद असंविधानिक असल्याचे म्हणताच धनंजय मुंडे यांना बाजुला बसलेल्या अजित पवारांची आठवण आली आणि त्यांनी अजित पवारांची माफीदेखील मागितली. धनंजय मुंडे म्हणाले, माफ करा दादा. पुढे फडणवीसांना उद्देशून त्यांनी म्हटले, 120 सदस्य असूनदेखील तुम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले. याचे दु:ख तुमच्यापेक्षा अधिक आम्हाला होते. आता तुम्ही सत्ता मिळवली, पण उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागतेय. त्यामुळे नगराध्यक्ष जनतेतून निवडला जावा, असे तुम्हाला वाटत असेल तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून निवडला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

 

Web Title :- Dhananjay Munde | ncp leader dhananjay munde on devendra fadnavis and deputy cm post in vidhansabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | नवनीत राणांच्या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? शरद पवार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस?

 

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’