Dhananjay Munde On Dhangar Reservation | ‘धनगर आरक्षणाचा ठराव केंद्राकडे आम्ही पाठवू, मगच कळेल…’ – धनंजय मुंडे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dhananjay Munde On Dhangar Reservation | एसटी प्रवर्गात धनगर समाजाला समाविष्ट करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच यासंदर्भात विधिमंडळात ठराव करून तो केंद्राकडे पाठवणार आहे. त्यावेळी कळेल की कोणाच्या मनात नक्की काय आहे अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

 

अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

धनंजय मुंडे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी केलेले कार्य एका जाती धर्मापुरते मर्यादित नव्हते. तेच कार्य छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्या असेही ते म्हणाले. (Dhananjay Munde On Dhangar Reservation)

 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, धनगर आरक्षणाचा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आदिवासी समाजाप्रमाणे जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पवार कुटुंबीयांनी दिलेले योगदान समाजबांधवांनी लक्षात घ्यावे. त्यांच्यामुळेच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदाची संधी मिळाली.
समाजाचे नाव घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडणारे काही लोक राजकीय स्वार्थ साधण्याचे काम करत आहेत.
सोलापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४.५० कोटी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आमच्या दोघांच्या अनुपस्थितीची ब्रेकिंग

खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना या कार्यक्रमाला पोहोचता येणे शक्य झाले नाही.
निरोपामुळेच ऐनवेळी मी आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहे.
मुंबईत विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे.
तेथे आम्ही दोघे नसल्याने त्याचीही ब्रेकिंग सुरू होईल अशी मिश्किल टिप्पणीही धनंजय मुंडे यांनी केली.

 

Web Title :- Dhananjay Munde On Dhangar Reservation | maharashtra minister dhananjay munde speaks on dhangar reservation baramati mahavikas aghadi dattatray bharne

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा