काही जण पराभवाचं वर्ष साजरे करण्यासाठी बीडला येतात, धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांना टोला

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – काही जण पराभवाचे वर्ष साजरे करण्यासाठी बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण झाली नाही. कोरोनाच्या संकटात घरात बसून राहिले. मदतीसाठी कुणी समोर आले नाही, असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (dhananjay-munde) यांनी नामोल्लेख न करता पंकजा मुंडे (pankaja-munde) यांना टोला लगावला. तसेच आम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो, पण जनतेला वाऱ्यावर सोडून दिलो नव्हतो, असेही मुंडे यांनी यावेळी म्हटल आहे.

केज येथील येडेश्वरी साखर कारखानाच्या 20-21 च्या गाळप हंगाम उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले की, ऊसतोड मजूर (-sugarcande-worker) आंदोलन हे भाववाढी पुरते आहे. उसतोड मजूर दुसऱ्याच्या रानात जाणार नाही. यासाठी मोठी मदत करणार आहे. ऊसतोड मजूर ऊस उत्पादक शेतकरी झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितले. मांजरा धारण 70 टक्के, उस्मानाबाद धारण 30 टक्के भरले आहे. तीन जिल्ह्यासाठी सर्वाधिक फायदा बीडला झाला पाहिजे. थेंब ना थेंब जास्त मिळवून देणार, असं आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिलं. ऊसतोड मजुरांना राज्य सरकार योग्य दर वाढ करेल, जाणीवपूर्वक ऊसतोड मजूर महामंडळ माझ्या विभागाकडे घेतले असल्याचं मुंडे यांनी सांगितले. मागच्या पाच वर्षात महामंडळची साधी नोंद नव्हती, रजिस्टर नव्हते मोकळ होते, अशा शब्दांत मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सणसणीत टीका केली.

पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑनलाईन दसरा मेळावा घेणे महागात पडण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजुरे, आमदार मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि इतर 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जिथे आहे तिथेच राहणार, पक्ष सोडण्याच्या चर्चांना पुर्णविराम
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करून पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देतानाच येत्या काळात केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचं आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचं आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली. मी घर बदलणार नाही, जिथे आहे तिथेच राहणार आहे. आता मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाचे काम देशाच्या पातळीवर करणार आहे, असं सांगत पंकजा यांनी पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.